Sunday 12 May 2019

तुझाच जयजयकार..आई...

तुझाच जयजयकार..आई...


आयुष्यभराचे ऋण तुझे..
माझे हे फक्त शब्द चार..
तुझाच जयजयकार आई
तुझाच जयजयकार..

किती गोडवे गाऊ गं तुझे..
मला शब्द पडतील अपुरे..
मातृदिन एक निमित्त मात्र
हे जन्मभराचे सोहळे..
घर आणि ऑफीस सांभाळताना
नेहमीच तारेवरची कसरत फार..
जिद्द तू सोडत नाहीस तरीही
जरी असला तुझ्यावर कितीही भार..
इंच इंच लढवत राहतेस मानत नाहीस कधी हार..
तुझाच जयजयकार आई
तुझाच जयजयकार..

मातृत्वाच्या त्या अलौकिक आसमंतात
होतात आमची अनेक स्वप्न साकार..
मायेने हात फिरवून देत असतेस 
आमच्या आयुष्याला तू आकार..
खरंतर
तुझं अस्तित्व म्हणजेच माझ्या जीवनाचा सार..
तुझाच जयजयकार आई
तुझाच जयजयकार..

म्हणून म्हणतो..
आयुष्यभराचे ऋण तुझे..
माझे हे फक्त शब्द चार..
तुझाच जयजयकार आई
तुझाच जयजयकार..


- निनाद वाघ